नरेन्द्र मोदी विकास मंच रायगड जिल्हाध्यक्षपदी उत्तमराव मोरे यांची निवड
कर्नाटक :15ऑक्टों (प्रतिनिधी) कर्नाटका राज्यात कलबुर्गी येथे नरेंद्र मोदी विचार मंच चे 20 वे राष्ट्रीय अधिवेशन मोठया उत्साही वातावरण संपन्न झाले, कार्यक्रमाला पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. यावेळी मान्यवरांनी अनमोल असे मार्गदर्शन केले. ना प्रांत वाद ना जातीय वाद आता फक्त विकासवाद, या धेयाने विकास कामे सुरू आहेत. अधिवेशनास रोहा मधिल उत्तमराव मोरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आणि त्यांच्या खांद्यावर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नरेंद्र मोदी विचार मंचच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी उत्तमराव मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मोरे यांची निवड होताच त्यांचें सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.
20 वे राष्ट्रीय अधिवेशन कलबुर्गी, कर्नाटक राज्य या ठिकाणी झाले. नरेंद्र मोदी विचार मंच चे राष्ट्रीय अध्यक्ष रवि चाणक्य, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेश भोसले, भाजपा खासदार उमेश जाधव गुलबर्गा कर्नाटका राज्य अध्यक्ष शिवराज शेट्टी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रमपटील यांसह देश भरांतून आलेले पदाधिकारी उपस्थितीत होते. रोहा धाटाव येथे राहणारे उत्तमराव मोरे यांचे विवीध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सुरू आहे, त्यांनी विवीध पदांवर उत्तम प्रकारे काम केल आहे. राष्ट्रीय पर्यावरण खनिज संरक्षण जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय नागरी व पर्यावरण संघटना मार्फत पर्यावरण वृक्षारोपण, करून निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला. राजेश भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली प्रांत ग्राहक संरक्षण परीषदेच्या राष्ट्रीय महासचिव पदी आहेत, त्यांच्या कार्याचे फार मोठे योगदान आहे. त्यांच्या सामजिक कार्यची दखल घेण्यात आली आणि नरेंद्र मोदी विचार मंचच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे . हिंदुस्थानसह महाराष्ट्रात पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे विचार मंच च्या माध्यमातून घरा घरात पोहचले आहेत. आणि हेच विचार पुढे नेण्याचे कार्य रायगड मध्ये उत्तमराव मोरे करत आहेत

Comments
Post a Comment