Posts

Showing posts from August, 2023
Image
  सिंधुदुर्ग जिल्ह्यात ब्लॅक पँथरचा वावर सिंधुदुर्ग:26ऑगस्ट ( प्रतिनिधि) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमध्ये गुरुवार दि. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या दरम्यान नागरीकांना (ब्लॅक पँथर) काळ्या बिबट्याचे दर्शन झाले. मिलिंद गडकरी हे  संध्याकाळी फेरफटका मारत असताना या काळ्या बिबट्याचे त्यांना दर्शन झाले होते. त्यांनी तात्काळ वन विभागाला घटनेची माहिती दिली आहे. यापूर्वीही अशा काळ्या बिबट्यांचा वावर वाढला होता. असे काही नागरिकांचे म्हणणे आहे.  २०१४ साली आजऱ्यामध्ये( ब्लॅक पँथर,) काळ्या बिबट्याची नोंद झाली होती. तसेच २०१६ मध्ये तिलारीमधूनही काळ्या बिबट्याची नोंद करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी कुडाळ तालुक्यात काळ्या बिबट्याच्या बछड्याला पकडण्यात आले होते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ब्लॅक पँथर काळ्या बिबटय़ाचा वावर असल्याचे सिद्ध झाले आहे. काळा रंगाचा बिबट्या हा सामान्य बिबट्यांसारखाच असतो. मात्र त्यात मेलानिनचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्वचेचा रंग काळा झालेला पहायला मिळतो. सह्याद्रीमध्ये ब्लॅक पँथर आहेत ही एक सकारात्मक गोष्ट असल्याचे तज्ञ सांगतात. मेलानिस्टीक बिबटे साधारणतः घनदाट जं...
Image
पेण कनिष्ठ न्यायालयात न्यायमूर्ती रुबिना मुजावर यांच्या हस्ते ई-फायलींग सेंटरचा उद्घाटन सोहळा संपन्न पेण (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाच्या संकल्पनेनुसार न्यायालयांचे कामकाज आता ‘पेपरलेस’ पद्धतीने होणार आहे. यासाठी रायगड जिल्ह्यातील,जिल्हा अलिबाग न्यायालयात ई-फायलिंग यंत्रणा कार्यान्वित झाली असून आता महाड पाठोपाठ पेण कनिष्ठ न्यायालयात  ई- फायलींची सेंटरचे उद्घाटन  न्यायमूर्ती रुबिना मुजावर  सह.न्यायमूर्ती प्रितेश देशमुख , आणि  जिल्हा ई-फायलींग सेंटर प्रमुख अमित देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.  रायगड जिल्ह्यातील हे न्यायालयीन कामकाजातील  तिसरे सेंटर पेण न्यायालयात सुरू झाले आहे.१४ तालुका न्यायालयात ही प्रणाली कार्यन्वित होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले असून यासाठी सर्व आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. उच्च न्यायालय व  महाराष्ट्र-गोवा वकील संघाच्या पुढाकाराने ही प्रणाली कार्यन्वित करण्यात येत आहे. पहिल्या टप्पात प्रमुख जिल्हा न्यायालयात ई-फायलिंग व फॅसिलिटी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. यामुळे आता दाखल होणारी नवीन प्रकरणे( खटले) ऑनलाईन पद्ध...
Image
जे पक्ष आमच्याशी गद्दारी करतील त्यांचा आम्ही बदला घेऊ: चित्रलेखा पाटील   रोहा:26ऑगस्ट (दिप वायडेकर) रोहा तालुक्यातील यशवंतखार येथे आज शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 200 हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिरानंतर दिव्यांग महिलांना सायकलचे  वाटप करण्यात आले. या शिबिरा करिता शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा चित्रलेखा ताई पाटील यांची प्रमुख मान्यवर म्हणुन उपस्थीत होत्या. त्यांच्या समवेत व्यासपीठावर    रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गणेश मढवी ,माजी जिल्हा परिषद सदस्य नंदूशेठ म्हात्रे ,माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण महाले ,खरेदी विक्री संघ रोहा तालुकाध्यक्ष शंकरराव म्हस्कर , रायगड जिल्हा फॅब्रिकेशनचे अध्यक्ष हेमंत ठाकूर, कृषी उत्पन्न समितीचे उपसभापती पांडुरंग ठाकूर, रोहा तालुका शेतकरी कामगार पक्षाचे कार्याध्यक्ष जितेंद्र जोशी, अमोल शिंघ्रे ,संतोष शिंघ्रे, संतोष देवकर, परेश म्हात्रे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. चित्राताई  माध्यमांशी बोलताना म्हणाल्या ,जे पक्ष आमच्याशी (शेक...