जे पक्ष आमच्याशी गद्दारी करतील त्यांचा आम्ही बदला घेऊ: चित्रलेखा पाटील 

रोहा:26ऑगस्ट (दिप वायडेकर)

रोहा तालुक्यातील यशवंतखार येथे आज शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 200 हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिरानंतर दिव्यांग महिलांना सायकलचे  वाटप करण्यात आले. या शिबिरा करिता शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा चित्रलेखा ताई पाटील यांची प्रमुख मान्यवर म्हणुन उपस्थीत होत्या. त्यांच्या समवेत व्यासपीठावर 

  रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गणेश मढवी ,माजी जिल्हा परिषद सदस्य नंदूशेठ म्हात्रे ,माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण महाले ,खरेदी विक्री संघ रोहा तालुकाध्यक्ष शंकरराव म्हस्कर , रायगड जिल्हा फॅब्रिकेशनचे अध्यक्ष हेमंत ठाकूर, कृषी उत्पन्न समितीचे उपसभापती पांडुरंग ठाकूर, रोहा तालुका शेतकरी कामगार पक्षाचे कार्याध्यक्ष जितेंद्र जोशी, अमोल शिंघ्रे ,संतोष शिंघ्रे, संतोष देवकर, परेश म्हात्रे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

चित्राताई  माध्यमांशी बोलताना म्हणाल्या ,जे पक्ष आमच्याशी (शेकाप )गद्दारी करतील त्यांचा आम्ही  बदला घेऊच! , बीजेपी सोबत आम्ही  जाणार नाही. त्याचप्रमाणे पेण मधील नेता जरी आमचा गेला असेल. तरी कार्यकर्ते जिथंल्या तिथेच आहे. तिथे विजय हा शेतकरी कामगार पक्षाचा होईल. असा आशावाद ही त्यांनी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog