पेण कनिष्ठ न्यायालयात न्यायमूर्ती रुबिना मुजावर यांच्या हस्ते ई-फायलींग सेंटरचा उद्घाटन सोहळा संपन्न

पेण (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाच्या संकल्पनेनुसार न्यायालयांचे कामकाज आता ‘पेपरलेस’ पद्धतीने होणार आहे. यासाठी रायगड जिल्ह्यातील,जिल्हा अलिबाग न्यायालयात ई-फायलिंग यंत्रणा कार्यान्वित झाली असून आता महाड पाठोपाठ पेण कनिष्ठ न्यायालयात  ई- फायलींची सेंटरचे उद्घाटन  न्यायमूर्ती रुबिना मुजावर  सह.न्यायमूर्ती प्रितेश देशमुख , आणि  जिल्हा ई-फायलींग सेंटर प्रमुख अमित देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.  रायगड जिल्ह्यातील हे न्यायालयीन कामकाजातील  तिसरे सेंटर पेण न्यायालयात सुरू झाले आहे.१४ तालुका न्यायालयात ही प्रणाली कार्यन्वित होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले असून यासाठी सर्व आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. उच्च न्यायालय व  महाराष्ट्र-गोवा वकील संघाच्या पुढाकाराने ही प्रणाली कार्यन्वित करण्यात येत आहे. पहिल्या टप्पात प्रमुख जिल्हा न्यायालयात ई-फायलिंग व फॅसिलिटी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. यामुळे आता दाखल होणारी नवीन प्रकरणे( खटले) ऑनलाईन पद्धतीने  दाखल करण्यात येत आहे.  यासाठी सुविधा केंद्रात २ संगणक, २ स्कॅनर प्रिंटर, वेब कॅमेरा, माईक ही  उपकरणे बसविण्यात आली आहे. केंद्रात वकिलांच्या मदतीसाठी २ परिचालक नियुक्त करण्यात आले आहे. या ई-फाईलींग सेंटर कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर मंडळी मधे पेण बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट बी.व्ही.म्हात्रे, सेक्रेटरी,ॲडव्होकेट आर.आर.म्हात्रे, खजीनदार ॲडव्होकेट सुयोग कडू, जेष्ठ सदस्य रविकांत म्हात्रे, स्वागत पाटील, वनश्री कामत, सेंटरच्या संचालिका ॲड.विद्या म्हात्रे, टेक्निशियन ॲड.अमित गावंड, संकेत टक्के,मनिष म्हात्रे, आणि बार असोसिएशनचे सर्व वकील मंडळी उपस्थित होती. यावेळी प्रमुख मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करुन या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog