नरेन्द्र मोदी विकास मंच रायगड जिल्हाध्यक्षपदी उत्तमराव मोरे यांची निवड कर्नाटक :15ऑक्टों (प्रतिनिधी) कर्नाटका राज्यात कलबुर्गी येथे नरेंद्र मोदी विचार मंच चे 20 वे राष्ट्रीय अधिवेशन मोठया उत्साही वातावरण संपन्न झाले, कार्यक्रमाला पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. यावेळी मान्यवरांनी अनमोल असे मार्गदर्शन केले. ना प्रांत वाद ना जातीय वाद आता फक्त विकासवाद, या धेयाने विकास कामे सुरू आहेत. अधिवेशनास रोहा मधिल उत्तमराव मोरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आणि त्यांच्या खांद्यावर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नरेंद्र मोदी विचार मंचच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी उत्तमराव मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मोरे यांची निवड होताच त्यांचें सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे. 20 वे राष्ट्रीय अधिवेशन कलबुर्गी, कर्नाटक राज्य या ठिकाणी झाले. नरेंद्र मोदी विचार मंच चे राष्ट्रीय अध्यक्ष रवि चाणक्य, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेश भोसले, भाजपा खासदार उमेश जाधव गुलबर्गा कर्नाटका राज्य अध्यक्ष शिवराज शेट्टी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रमपटील यांसह...