इनरव्हील क्लब ऑफ पेण आणि रोटरी क्लब ऑफ पेण यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माल्य कलश उपक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद

पेण:(प्रतिनिधी) रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गणेशोत्सवानिमित्ताने ठिकठिकाणी दीड ,पाच,दहा दिवसाच्या गणपती बाप्पाचे आगमन होते , या वेळी बेल ,दुर्वा , फुल , हार यांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला . 

नरव्हील क्लब ऑफ पेण आणि रोटरी क्लब ऑफ पेण यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माल्य कलश हा उपक्रम राबविण्यात आला ,पर्यावरण संरक्षण तसेच टाकाऊ पासून नवनिर्मिती ,प्रदूषणाला आळा घालणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट होते .विसर्जनाच्या दरम्यान गणपती बाप्पाला अर्पण केलेले  सर्व साहित्य पाण्यात विसर्जित केले जाते , आणि पाण्याचे प्रदूषण होते ते प्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्य गोळा करण्यात आला. सर्व निर्माल्य वेगवेगळा गोळा करण्यात आला  सदर निर्माल्यापासून अगरबत्ती बनवण्याचा उपक्रम घेण्यात येणार आहे तसेच काही निर्माल्य साहित्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे असे इनरव्हील क्लब च्या अध्यक्षा ज्योती अवघडे यांनी यावेळी आमच्या प्रतिनिधि जवळ बोलताना सांगितले.पाण्याचे, हवेचे,प्रदूषण टाळण्यासाठी सर्वत्र निर्माल्य गोळा करण्यात आला. या उपक्रमाला  इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा ज्योती अवघडे, उपाध्यक्ष सोनाली पाटील, दक्षता जाधव, रुची महालकर, प्रियांकि मुखर्जी, दीपिका शिगवण, मेघना चव्हाण ,भावना पगारे तसेच रोटरीची अध्यक्ष मधुबाला निकम सचिव जयेश शहा, संयोगीता टेमघरे ,विजय शहा,अशोक जैन जयंत आपटे, व अन्य सदस्य उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog