नरेन्द्र मोदी विकास मंच रायगड जिल्हाध्यक्षपदी उत्तमराव मोरे यांची निवड कर्नाटक :15ऑक्टों (प्रतिनिधी) कर्नाटका राज्यात कलबुर्गी येथे नरेंद्र मोदी विचार मंच चे 20 वे राष्ट्रीय अधिवेशन मोठया उत्साही वातावरण संपन्न झाले, कार्यक्रमाला पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. यावेळी मान्यवरांनी अनमोल असे मार्गदर्शन केले. ना प्रांत वाद ना जातीय वाद आता फक्त विकासवाद, या धेयाने विकास कामे सुरू आहेत. अधिवेशनास रोहा मधिल उत्तमराव मोरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आणि त्यांच्या खांद्यावर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नरेंद्र मोदी विचार मंचच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी उत्तमराव मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मोरे यांची निवड होताच त्यांचें सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे. 20 वे राष्ट्रीय अधिवेशन कलबुर्गी, कर्नाटक राज्य या ठिकाणी झाले. नरेंद्र मोदी विचार मंच चे राष्ट्रीय अध्यक्ष रवि चाणक्य, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेश भोसले, भाजपा खासदार उमेश जाधव गुलबर्गा कर्नाटका राज्य अध्यक्ष शिवराज शेट्टी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रमपटील यांसह...
Popular posts from this blog
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ब्लॅक पँथरचा वावर सिंधुदुर्ग:26ऑगस्ट ( प्रतिनिधि) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमध्ये गुरुवार दि. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या दरम्यान नागरीकांना (ब्लॅक पँथर) काळ्या बिबट्याचे दर्शन झाले. मिलिंद गडकरी हे संध्याकाळी फेरफटका मारत असताना या काळ्या बिबट्याचे त्यांना दर्शन झाले होते. त्यांनी तात्काळ वन विभागाला घटनेची माहिती दिली आहे. यापूर्वीही अशा काळ्या बिबट्यांचा वावर वाढला होता. असे काही नागरिकांचे म्हणणे आहे. २०१४ साली आजऱ्यामध्ये( ब्लॅक पँथर,) काळ्या बिबट्याची नोंद झाली होती. तसेच २०१६ मध्ये तिलारीमधूनही काळ्या बिबट्याची नोंद करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी कुडाळ तालुक्यात काळ्या बिबट्याच्या बछड्याला पकडण्यात आले होते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ब्लॅक पँथर काळ्या बिबटय़ाचा वावर असल्याचे सिद्ध झाले आहे. काळा रंगाचा बिबट्या हा सामान्य बिबट्यांसारखाच असतो. मात्र त्यात मेलानिनचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्वचेचा रंग काळा झालेला पहायला मिळतो. सह्याद्रीमध्ये ब्लॅक पँथर आहेत ही एक सकारात्मक गोष्ट असल्याचे तज्ञ सांगतात. मेलानिस्टीक बिबटे साधारणतः घनदाट जं...
पत्रकार मित्र संघाच्या वतीने नारळी पौर्णिमा सन उत्साहात साजरा रोहा:31ऑगस्ट (दिपक शिंदे) रोहा तालुक्यात नारळी पौर्णिमा सन उत्साहात साजरा करण्यात आला. पत्रकार मित्र संघाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावेळीही नारळी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. पत्रकार मित्र संघाचे अध्यक्ष सचिन साळुंखे, घनशाम कराळे, अवधूत चौधरी व अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते. पत्रकार मित्र संघ गेले अनेक वर्षे सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. त्याअनुषंगाने नारळी पौर्णिमा उत्सव ही तेवढ्याच आनंदी वातावरणात साजरा केला जातो. रोहा नगरीच्या कुंडलिका नदीवर सोन्याच्या प्रतिकृतीचा नारळ घेऊन त्यांची विधिवत पूजाअर्चा करून नदीला अर्पण केला जातो. कोकणी लोकांचा खास सण म्हणजे नारळी पौर्णिमा. समुद्रात जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र तसेच नदी शांत होण्यासाठी कोळी बांधव व अन्य नागरीक या दिवशी समुद्राची , नदीची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला, तसेच गाव ठिकाणीं नदी मध्ये यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अथवा साधा नारळ अर्पण करत असतात. पत्रकार मित्र संघाचे सदस्य अशाच प्रकारे रोहा मधील कुंडलिका नदीची पूजा करून नदीला...

Comments
Post a Comment