उत्तमभाऊ मोरे यांची राष्ट्रीय पर्यावरण खनिज संवरक्षण मंचच्या जिल्हाध्यक्षपदी निवड
रोहा:12सप्टें(प्रतिनिधी) राष्ट्रीय पर्यावरण खनिज संवरक्षण मंचचे समजिक कार्य महाराष्ट्रात मोठया प्रमाणात सूरू आहे मुंबई, ठाणे, कोकण विभागात मंच वाढत आहे.
उत्तमराव मोरे यांची राष्ट्रीय पर्यावरण खनिज संवरक्षण मंच च्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.रायगड जिल्हा अध्यक्षपदी निवड होताच उत्तमभाऊ मोरे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
राष्ट्रीय पर्यावरण खनिज संवरक्षण मंच संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात पर्यावरण संवरक्षणाचे कार्य सूरू आहे.
उतमभाऊ मोरे हे अनेक वर्षे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. राष्ट्रीय नागरी व पर्यावरण तालुका अध्यक्ष पदी असताना मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रांत ग्राहक संरक्षण परीषदेच्या राष्ट्रीय महासचिव पदी सामजिक कार्य करत असताना
अनेक संघटनांमार्फत त्यांनी जिल्हयात मोठया प्रमाणात सामाजिक कार्याची चळवळ निर्माण केली आहे, निसर्ग संवरक्षण,पर्यावरण, वृक्षारोपण, संदर्भात मोठया प्रमाणात जनजागृती केली आहे. वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय पर्यावरण खनिज संवरक्षण मंच राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. लक्ष्मी आमेटा यांनी घेतली असून उत्तमभाऊ मोरे यांची रायगड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय मंच्या विशेष कार्यक्रमात उत्तमभाऊ मोरे यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे

Comments
Post a Comment