पत्रकार मित्र संघाच्या वतीने नारळी पौर्णिमा सन उत्साहात साजरा
रोहा:31ऑगस्ट (दिपक शिंदे) रोहा तालुक्यात नारळी पौर्णिमा सन उत्साहात साजरा करण्यात आला.
पत्रकार मित्र संघाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावेळीही नारळी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. पत्रकार मित्र संघाचे अध्यक्ष सचिन साळुंखे, घनशाम कराळे, अवधूत चौधरी व अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते.
पत्रकार मित्र संघ गेले अनेक वर्षे सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. त्याअनुषंगाने नारळी पौर्णिमा उत्सव ही तेवढ्याच आनंदी वातावरणात साजरा केला जातो. रोहा नगरीच्या कुंडलिका नदीवर सोन्याच्या प्रतिकृतीचा नारळ घेऊन त्यांची विधिवत पूजाअर्चा करून नदीला अर्पण केला जातो.
कोकणी लोकांचा खास सण म्हणजे नारळी पौर्णिमा. समुद्रात जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र तसेच नदी शांत होण्यासाठी कोळी बांधव व अन्य नागरीक या दिवशी समुद्राची , नदीची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला, तसेच गाव ठिकाणीं नदी मध्ये यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अथवा साधा नारळ अर्पण करत असतात. पत्रकार मित्र संघाचे सदस्य अशाच प्रकारे रोहा मधील कुंडलिका नदीची पूजा करून नदीला नारळ अर्पण करतात.

Comments
Post a Comment