कोलाड काँग्रेस तर्फे चिंचवली वाडीत स्वच्छता अभियान

रोहा दि. ०१ सप्टें. प्रतिनिधी ;- तालुक्यातील कोलाड विभाग काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हरिओम टाळकुठे यांच्या विशेष प्रयत्नातून कोलाड येथील चिंचवली खोंड्याचीवाडी या लोकवस्तीत ग्राम स्वछता अभियान राबविण्यात आले. या अभियानाला खोंड्याची वाडी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  या अभियानात विभाग अध्यक्ष हरिओम टाळकूठे,  किल्ला गावं कमिटीचे अध्यक्ष मंगेश जाधव, उपाध्यक्ष दिनेश जाधव, नितीन कोळी, नितीन पवार, खोंड्याची वाडी काँग्रेस कमिटी अध्यक्ष समीर पवार, उपाध्यक्ष महादेव पवार, सचिव विनायक कोळी, जेष्ठ नागरिक सखाराम आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्वछता मोहिमे नंतर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्थानिक नागरिकांशी विविध विषयी चर्चा केली. संत गाडगे बाबा यांच्या विचारांवर प्रेरित होऊन आपण स्वछता अभियान हाती घेतले आहे असे हरिओम टाळकूठे म्हणाले. या मोहिमेला स्थानिक नागरिकांनी सहकार्य केल्याबद्दल टाळकूठे यांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त करून भविष्यात वाडीवस्तीवरील लोक उपयोगी कामे मार्गी लावणार असल्याचे अभिवचन टाळकूठे यांनी दिले. त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सदर उपक्रम आपण हाती घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog