Posts

Image
  नरेन्द्र मोदी विकास मंच रायगड जिल्हाध्यक्षपदी       उत्तमराव मोरे यांची निवड कर्नाटक :15ऑक्टों (प्रतिनिधी) कर्नाटका राज्यात कलबुर्गी येथे नरेंद्र मोदी विचार मंच चे 20 वे राष्ट्रीय अधिवेशन मोठया उत्साही वातावरण संपन्न झाले, कार्यक्रमाला पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. यावेळी मान्यवरांनी अनमोल असे मार्गदर्शन केले. ना प्रांत वाद ना जातीय वाद आता फक्त विकासवाद, या धेयाने विकास कामे सुरू आहेत. अधिवेशनास रोहा मधिल उत्तमराव मोरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आणि त्यांच्या खांद्यावर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नरेंद्र मोदी विचार मंचच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी उत्तमराव मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मोरे यांची निवड होताच त्यांचें सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.  20 वे राष्ट्रीय अधिवेशन कलबुर्गी, कर्नाटक राज्य या ठिकाणी झाले. नरेंद्र मोदी विचार मंच चे राष्ट्रीय अध्यक्ष रवि चाणक्य, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेश भोसले, भाजपा खासदार उमेश जाधव गुलबर्गा कर्नाटका राज्य अध्यक्ष शिवराज शेट्टी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रमपटील यांसह...
Image
  इनरव्हील क्लब ऑफ पेण आणि रोटरी क्लब ऑफ पेण यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माल्य कलश उपक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद पेण:(प्रतिनिधी) रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गणेशोत्सवानिमित्ताने ठिकठिकाणी दीड ,पाच,दहा दिवसाच्या गणपती बाप्पाचे आगमन होते , या वेळी बेल ,दुर्वा , फुल , हार यांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला .  नरव्हील क्लब ऑफ पेण आणि रोटरी क्लब ऑफ पेण यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माल्य कलश हा उपक्रम राबविण्यात आला ,पर्यावरण संरक्षण तसेच टाकाऊ पासून नवनिर्मिती ,प्रदूषणाला आळा घालणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट होते .विसर्जनाच्या दरम्यान गणपती बाप्पाला अर्पण केलेले  सर्व साहित्य पाण्यात विसर्जित केले जाते , आणि पाण्याचे प्रदूषण होते ते प्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्य गोळा करण्यात आला. सर्व निर्माल्य वेगवेगळा गोळा करण्यात आला  सदर निर्माल्यापासून अगरबत्ती बनवण्याचा उपक्रम घेण्यात येणार आहे तसेच काही निर्माल्य साहित्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे असे इनरव्हील क्लब च्या अध्यक्षा ज्योती अवघडे यांनी यावेळी आमच्या प्रतिनिधि जवळ बोलताना सांग...
Image
 भोकटे परिवाराच्या मानाच्या गणपती बाप्पाला भक्तीमय वातावरणात निरोप 
Image
  उत्तमभाऊ मोरे यांची राष्ट्रीय पर्यावरण खनिज संवरक्षण मंचच्या  जिल्हाध्यक्षपदी निवड रोहा:12सप्टें(प्रतिनिधी) राष्ट्रीय पर्यावरण खनिज संवरक्षण मंचचे समजिक कार्य महाराष्ट्रात मोठया प्रमाणात सूरू आहे मुंबई, ठाणे, कोकण विभागात मंच वाढत आहे. उत्तमराव मोरे यांची राष्ट्रीय पर्यावरण खनिज संवरक्षण मंच च्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.रायगड जिल्हा अध्यक्षपदी निवड होताच उत्तमभाऊ मोरे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.  राष्ट्रीय पर्यावरण खनिज संवरक्षण मंच   संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात पर्यावरण संवरक्षणाचे कार्य सूरू आहे.  उतमभाऊ मोरे हे अनेक वर्षे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. राष्ट्रीय नागरी व पर्यावरण तालुका अध्यक्ष पदी असताना मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रांत ग्राहक संरक्षण परीषदेच्या राष्ट्रीय महासचिव पदी सामजिक कार्य करत असताना  अनेक संघटनांमार्फत त्यांनी जिल्हयात मोठया प्रमाणात सामाजिक कार्याची चळवळ निर्माण केली आहे, निसर्ग संवरक्षण,पर्यावरण, वृक्षारोपण, संदर्भात मोठया प्रमाणात जनजागृ...
Image
  कोलाड काँग्रेस तर्फे चिंचवली  वाडीत स्वच्छता अभियान रोहा दि. ०१ सप्टें. प्रतिनिधी ;- तालुक्यातील कोलाड विभाग काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हरिओम टाळकुठे यांच्या विशेष प्रयत्नातून कोलाड येथील चिंचवली खोंड्याचीवाडी या लोकवस्तीत ग्राम स्वछता अभियान राबविण्यात आले. या अभियानाला खोंड्याची वाडी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  या अभियानात विभाग अध्यक्ष हरिओम टाळकूठे,  किल्ला गावं कमिटीचे अध्यक्ष मंगेश जाधव, उपाध्यक्ष दिनेश जाधव, नितीन कोळी, नितीन पवार, खोंड्याची वाडी काँग्रेस कमिटी अध्यक्ष समीर पवार, उपाध्यक्ष महादेव पवार, सचिव विनायक कोळी, जेष्ठ नागरिक सखाराम आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्वछता मोहिमे नंतर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्थानिक नागरिकांशी विविध विषयी चर्चा केली. संत गाडगे बाबा यांच्या विचारांवर प्रेरित होऊन आपण स्वछता अभियान हाती घेतले आहे असे हरिओम टाळकूठे म्हणाले. या मोहिमेला स्थानिक नागरिकांनी सहकार्य केल्याबद्दल टाळकूठे यांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त करून भविष्यात वाडीवस्तीवरील लोक उपयोगी कामे मार्गी लावणार असल्या...
Image
श्री.धावीर मंदिर सुशोभीकरणाचा निधी परत गेल्याने नागरिकांत संताप  रोहा, दि. ३१ऑगस्ट:सचिन साळुंखे:- रायगड जिल्हा नियोजन समितीत मंजूर झालेल्या निधीचे योग्य नियोजन न केल्याने निधी परत जाण्याची नामुष्की रोहा नगरपालिकेवर ओढवली आहे. नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळेच ही वेळ आल्याचा आरोप होत आहे. रोहा नगरीच्या प्रसिद्ध श्री.धावीर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी राखून ठेवलेला पाच लाख रुपयांचा निधी परत गेल्याने संताप व्यक्त होत आहे. शासन व जिल्हा नियोजन मंडळाकडून कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून दिला जातो. वेळेत नियोजन करून निधी खर्च करणे अपेक्षित असताना रोहा नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सन २०२२-२३ या वर्षातील धावीर मंदिर सुशोभीकरणाचा पाच लाख रुपयांचा निधी शासनाकडे परत गेल्याने खळबळ उडाली आहे. नागरीक संताप व्यक्त करत आहेत.सदर निधी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी मंजूर झाला होता. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी 'धावीर मंदिर सुशोभीकरण करणे' कामाला प्रशासकीय मान्यता घेऊन निधीची मागणी करणे अपेक्षित होते, परंतु नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने कुठलेही नियोजन न केल्याने सदर काम रद्द करण्यात आले. म...
Image
पत्रकार मित्र संघाच्या वतीने नारळी पौर्णिमा सन उत्साहात साजरा रोहा:31ऑगस्ट (दिपक शिंदे) रोहा तालुक्यात नारळी पौर्णिमा सन उत्साहात साजरा करण्यात आला. पत्रकार मित्र संघाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावेळीही नारळी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. पत्रकार मित्र संघाचे अध्यक्ष सचिन साळुंखे, घनशाम कराळे, अवधूत चौधरी व अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते. पत्रकार मित्र संघ गेले अनेक वर्षे सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. त्याअनुषंगाने नारळी पौर्णिमा उत्सव ही तेवढ्याच आनंदी वातावरणात साजरा केला जातो. रोहा नगरीच्या कुंडलिका नदीवर सोन्याच्या प्रतिकृतीचा नारळ घेऊन त्यांची विधिवत पूजाअर्चा करून  नदीला अर्पण केला जातो. कोकणी लोकांचा खास सण म्हणजे नारळी पौर्णिमा. समुद्रात जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र तसेच नदी शांत होण्यासाठी  कोळी बांधव व अन्य नागरीक या दिवशी समुद्राची , नदीची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला, तसेच गाव ठिकाणीं नदी मध्ये यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अथवा साधा नारळ अर्पण करत असतात. पत्रकार मित्र संघाचे सदस्य अशाच प्रकारे रोहा मधील कुंडलिका नदीची पूजा करून नदीला...